पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन !

पिंपरी : अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार दि. ०१ नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील प्रशासकीय इमारतीमधील पत्रकार कक्षात ” दिवाळी फराळ ” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाची आज दिनांक २८ ऑक्टोबर रोजी पत्रकार कक्षात बैठक पार पडली. बैठकीत पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या सदस्यासाठी ” दिवाळी फराळ ” कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव, वरिष्ठ उपाध्यक्ष संतलाल यादव, उपाध्यक्ष महेश मंगवडे, संजय बोरा, सरचिटणीस बाबू कांबळे तसेच संघाचे सदस्य गणेश शिंदे, संतोष जराड, कलिंदर शेख, अमोल डंबाळे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात येणारा १ नोव्हेंबर चा ” दिवाळी फराळ ” हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात येणार असून हा कार्यक्रम स्मरणीय व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य प्रयत्न करणार असल्याचे संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव यांनी सांगितले आहे.