बातम्या उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ‘भगवा प्रहार’ November 18, 2024November 18, 2024 Editor महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे प्रचारासाठी विराट सभा पिंपरी-चिंचवप्रतिनिधी –सखी न्यूज लाईव्हसायली कुलकर्णीभारताचा पाया सनातन आहे आणि सनातवर प्रहार हा महाविनाशाला आमंत्रण आहे. ‘बटेथे तब कटेथे.. अब बटेंगे नहीं… एक रहेंगे तो सेफ रहेंगे’. काँग्रेस सत्ताकाळात पाकिस्तान भारतात घुसखोरी आणि आतंकी हल्ले करीत होता. आम्ही संसदेत आवाज उठवत होतो. त्यावेळी पाकिस्तानशी संबंध बिघडतील म्हणून काँग्रेस यामुद्दावर बोलू नका, अशी भूमिका घेत होते. मात्र, आता नवा भारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात नवा भारत म्हणजे ‘‘हम छेडेंग नहीं लेकीन हमें छेडेंगे तो छोडेगे नहीं’’ असा संदेश जगभरात गेला आहे. हा नवा भारत आहे. घुसखोरी कराल, तर घुसून मारण्याची हिंमत ठेवतो. देशाच्या समस्येचे कारण काँग्रेस आघाडी आहे, तर समस्यांवरील समाधान भाजपा महायुती आहे, असा घणाघात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केला.भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना- एनसीपी- आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी भोसरी येथील गावजत्रा मैदानावर रविवारी विराट सभा झाली. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि सभेला सुरूवात झाली.यावेळी खासदार श्रीरंग बारणे, गुजरातचे माजी मंत्री प्रदीज जडेजा, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, प्रखर हिंदूत्ववादी डॉ. मिलिंद एकबोटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, मंगला कदम, ज्येष्ठ नेते वसंत लोंढे, हभप दत्तात्रय गायकवाड, राष्ट्रवादीच्या कविता आल्हाट, शिवसेनेचे संभाजी शिरसाट, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, भाजपाचे शत्रुघ्न काटे, सुजाता पालांडे यांच्यासह महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते.योगी आदित्यनाथ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यभूमिला नमन करतो. महाराष्ट्रात नवीन सरकार बनवण्यासाठी निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात महायुती गठबंधन आहे. गेल्या १० वर्षांत नवा भारत निर्माण होत आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या भावनेतून देशाची प्रगती सुरू आहे. कुणाचे तुष्टीकरण केले जात नाही. भारताला जोडणाऱ्या शक्ती ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ विचाराने महागठबंधन म्हणून एकत्र आल्या आहेत. दुसऱ्या बाजुला ‘महाअनाडी गठबंधन’ आहे. ज्यांच्याकडे निती, नियत आणि निर्णय घेण्याची क्षमता आणि सामर्थ्य नाही. ‘‘सबका साथ लेकीन परिवारका विकास’’ असा ज्यांचा नारा आहे. त्यांनी भारताच्या विकासाचा विचार केला नाही.**काँग्रेसचा सत्ता लालसेमुळेच अखंड भारताचे विभाजन…काँग्रेसने सत्तेची लालसा ठेवली नसती, तर 1947 मध्ये अखंड भारत देशाचे विभाजन झाले नसते. भारत एकसंघ राहिला असता, लाखो निर्दोश हिंदू लोकांची कत्तल झाली नसती. ‘हिंदू-मुस्लिम’ अशी समस्या निर्माण झाली नसती. हिंदू-मुस्लिम समस्या भारताच्या विभाजनामुळे सुरू झाली. अखंड भारतात अशी समस्या निर्माण जरी झाली असती, तरी आज से आम्ही समस्येचा निपटारा करीत आहोत, तसाच हिंदु-मुस्लिम समस्येचा निपटारा केला असता. मात्र, काँग्रेसच्या सत्तालोलूपता आणि तुष्टिकरणाच्या भूमिकेमुळे देशाचे विभाजन झाले. स्वातंत्र्यानंतर जात-प्रांत अशा मुद्यांवर देशाचे विभाजन करण्यात आले, असा दावाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.**महाराष्ट्राबाबत संपूर्ण देशाला कृतज्ञता…महाराष्ट्राबाबत संपूर्ण देशवासीयांमध्ये कृतज्ञता भाव आहे. हिंदूवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या भूमित करुन दाखवली. अटक ते कटक अखंड भारत कसा असावा, याची शिकवण पेशवा बाजीराव यांनी दिली. ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ असे सांगणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक, सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकता संदेश देणारे महात्मा फुले, महिला शिक्षण भारताच्या सक्षमीकरणाचा आधार असेल असा संदेश देणाऱ्या सावित्रीबाई फुले, 1857 चे बंड हा भारताचा प्रथम स्वातंत्र्य लढा आहे असे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, ‘एक विधान सब है समान’ असे संविधान देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारखे महामानव देशाला देणारा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे या राज्याप्रती देशावासीयांना कृतज्ञता वाटते, अशा भावना योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केल्या आहेत. Post Views: 59