*पिंपरी महापालिकेच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी सायक्लोथाॅन आणि वाॅकेथाॅन कार्यक्रमाचे आयोजन*

Sakhi news live
पिंपरी- पिंपरी चिंचवड शहराने भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या इंडिया सायकल्स फाॅर चेंज या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.पायी चालणा-या पादचा-यांना व सायकलस्वारांना सुरक्षित व सोईस्कर सुविधा पुरविणे हा या उपक्रमाचा भाग आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची यंदा १५० वी जयंती आहे.त्याचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी यांचे संयुक्त विद्यमाने येत्या १ ऑक्टोबर गुरूवार रोजी सायक्लोथाॅन आणि वाॅकेथाॅन कार्यक्रमाचे आयोजन अॅटो क्लस्टर,चिंचवड येथे करण्यात आले आहे.त्याचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते सकाळी ७ वाजता मान्यवरांचे उपस्थितीत होणार आहे.
सायकलिंग अॅटो क्लस्टर ते काळेवाडी फाटा आणि काळेवाडी फाटा ते परत अॅटो क्लस्टर असे होणार असून याबाबत आपला सहभाग महानगरपालिकेच्या http://bit.ly/PCMCCyclothonReg या वेबसाईटवर नोंदणी करता येईल.यासाठी महानगरपालिकेकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.अधिक माहितीसाठी कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे यांचेशी ९९२२५०१७५६ या मोबाईल नंबरवर संपर्क साधता येईल.
तरी या उपक्रमात शहरातील सायकल प्रेमींनी सहभाग घ्यावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागरिकांना केले आहे..
सहाय्यक आयुक्त