मुजोर सवणेंना आवरणार कोण?
(पिंपरी,प्रतिनिधी)sakhi news live
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुमारे 110 कोटी रुपये खर्च करून नाशिक फाटा येथे दुमजली भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाणपूल उभारला मात्र केवळ पिंपरी महापालिकेच्या बेशिस्त व मनमानी अधिकाऱ्यांमुळे पिंपरी महापालिकेचे 14 कोटी रुपये पाण्यात गेले शिवाय नाशिक फाटा उड्डाणपुलाखाली भर चौकात वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबत अनेक वर्तमानपत्रामध्ये वारंवार बातम्या प्रकाशित होऊन ही पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर श्री सवणे यांच्यावर कसलीही कारवाई करताना दिसत नाहीत.
मुजोर सवणेंना आवरणार कोण?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अनेक गुणी कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्याबरोबरच काही “मुजोर”ही अधिकारी आहेत.त्यामध्ये पिंपरी महापालिकेचे सहशहर अभियंता या महत्वाच्या पदावर काम करणारे श्रीकांत सवणे यांच्या नावाची अधिक चर्चा आहे.
पिंपरी चिंचवड शहराच्या वैभवात भर घालणारा नाशिक फाटा येथील उड्डाण पूल बांधताना पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांनी भरपूर पैसे खर्च केले 100 कोटी ऐवजी 110 कोटी खर्च केले मात्र त्यापुलाला चुकीचा लूप(उतरता जिना)बांधून या उड्डाण पुलाला गालबोट लावण्याचे काम तत्कालीन कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.सुमारे 14 कोटी रुपये नाहक खर्च करून नाशिक फाटा चौकात वाहतुकीस अडचण निर्माण केली आहे.
पालिकेचा नाहक खर्च व रस्त्यावर अडचण निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यास पालिकेच्या आयुक्तांनी कडक कारवाई करावी मागणी माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश वाघिरे यांनी अनेक वेळा केली मात्र त्यांच्यावर कारवाई होण्याच्या ऐवजी त्यांना चुकीचे प्रमोशन देण्यात आले.त्यामुळेच श्री सवणे हे मुजोर झाल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी पिंपरी महापालिका प्रशासनात तीन वर्षे एकाच जाग्यावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आयुक्तांनी वेगवेगळ्या विभागात बदल्या केल्याचा आदेश काढला व त्यामध्ये बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी बदली झालेल्या ठिकाणी ” ताबडतोब ” रुजू व्हावे अन्यथा कडक कारवाई केली जाईल असे सांगितले. बदली आदेशाच्या यादीत श्रीकांत सवणे यांचे नाव होते. सवणे यांची बदली बांधकाम विभागात करण्यात आली होती.बदली आदेश मिळताच श्री सवणे सोडून सर्व अधिकारी बदली झालेल्या विभागात रुजू झाले मात्र श्री सवणे हे काही बदलीच्या जाग्यावर गेलेच नाहीत उलट एक महिन्याच्या कालावधीत त्यांना हवे असलेल्या विभागात बदली करून घेतली.
म्हणजेच मुजोर झालेले श्री यांनी आयुक्तांचा आदेश डावलला.श्री सवणे यांच्या हट्टापुढे पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर व त्यांचे संपुर्ण प्रशासन झुकले,असे हे महापालिकेचे कोरोडोंची नुकसान करणारे मुजोर व प्रशासनाला “टांगणारे” श्रीकांत सवणे यांना कोण व कसे आवरणार अशी पिंपरी महापालिकेत चर्चा सुरू आहे.