फुटबॉल स्पर्धेने शालेय क्रीडा स्पर्धाचे उपआयुक्त मनोज लोणकर यांचे हस्ते उद्घाटन!

पिंपरी प्रतिनिधी सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेने शालेय क्रीडा स्पर्धा २०२३ – २४ ची सुरवात करण्यात आली.
दिवंगत बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण पिंपळे सौदागर येथे क्रीडा विभागाचे उपआयुक्त मनोज लोणकर यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी अनिता केदारी, स्पर्धाप्रमुख तसेच क्रीडा पर्यवेक्षक आत्माराम महाकाळ, दिपक कन्ह्रेरे, अरुण कडूस, हरिभाऊ साबळे, भाऊसाहेब खैरे व मंगल जाधव उपस्थित होते.
उपआयुक्त लोणकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना मेस्सी, रोनाल्डो, मँराडोना यासारख्या महान खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन खेळामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत व पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पाडावी असे सांगितले. हरिभाऊ साबळे यांनी सर्व खेळाडूंना सचोटीने व खेळाडू वृत्तीने खेळण्याची शपथ दिली.
या स्पर्धेत १४ वर्षे मुले ४२ संघ व ६७२ खेळाडू तसेच १७ वर्षे मुले ४२ संघ व १७ वर्षे मुली २४ संघ सह्भागी झाले आहेत. एकूण १७२८ विद्यार्थी खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत अशी माहिती क्रीडा विभागाने दिली.