बातम्या

सत्तावीस वर्षांनंतर वर्गात पुन्हा भेट…

१९९८ची दहावीची बॅच भावूक वातावरणात एकत्र

चिंचवड प्रतिनिधी
सायली कुलकर्णी
9 डिसेंबर २०२५ पिंपरी चिंचवड येथील इंग्लिश स्कूलच्या १९९८ च्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थी तब्बल २७ वर्षांनी पुन्हा एकत्र आले आणि शालेय आठवणींना उजाळा देत स्नेहमेळाव्याचा मनसोक्त आनंद लुटला. शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या भावूक मेळाव्यास संस्थेच्या सचिव प्रज्ञा जोशी, डॉ. प्रसाद वायकुळे,चारुहास चिंचवडे अनिल खेडकर माजी प्राचार्य तसेच अनेक माजी शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व राष्ट्रगीताने झाली. अनेक वर्षांनी पुन्हा एका वर्गात बसण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी क्षणभर जणू शालेय जीवनात परत नेणारा ठरला. माजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी छोटेखानी शिकवणीचे तास घेतले आणि जुन्या आठवणींना सुखद स्पर्श मिळाला. विद्यार्थ्यांचे हशे, गप्पा, किस्से आणि शिक्षकांचे प्रेमळ मार्गदर्शन यामुळे शाळेची दालने पुन्हा एकदा उत्साहाने भरून गेली.

यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपली ओळख, व्यवसाय, आठवणी आणि मनोगत व्यक्त केले. शाळेने दिलेल्या संस्कारांनी जीवनाला दिशा मिळाल्याचा उल्लेख या वेळी वारंवार झाला. विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने संस्थेसाठी वॉटर कूलर आणि प्युरिफायर भेट देण्यात आला. या उपक्रमाचे कौतुक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिक्षकांनी विशेष केले.

उपस्थित विद्यार्थ्यांची यादी

मुली –
ज्योती इंदलकर, सुप्रिया घोडके, धनश्री प्रभुणे, पल्लवी वाईकर, रूपाली मारणे, श्रद्धा चिंचवडे, सारीका पाटील, मनिषा धावडे, ओवी यादव, गीतांजली रणनवरे, अश्विनी शिंदे, अश्विनी हुंबरे, अश्विनी चावक, सायली कुलकर्णी, अमृता भालेकर, लक्ष्मी भंडारी, मनिषा नाकाडे, मोहिनी चिंचवडे, प्रिती ठकार, दिपाली पेटकर, रचना राऊत, शुभांगी माधव, स्मिता शितोळे, सुरेखा भोसले, सुचिता तोतला, मंजू खराडे, शितल तोरवे.

मुले –
श्रीपाद जाधव, मुनीर शेख, आतीश शेलार, उमेश जगताप, अभिजीत उंडे, हरिष ललवाणी, केदार जोशी, प्रसाद खासनीस, भुषण नवाळे, प्रांजल केळकर, किरण भालेराव, दिनेश सांगळे, योगेश मिरजकर, भाग्येश वेदपाठक.

२७ वर्षांनंतर झालेला हा स्नेहमेळावा शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील प्रेमळ नात्याची जाणीव पुन्हा एकदा दृढ करून गेला. जुन्या मित्रांची भेट, आठवणींची उजळणी आणि मनमोकळ्या गप्पांनी संपूर्ण कार्यक्रम भावूक आणि आनंदमय वातावरणात पार पडला.