‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मजुरांच्या हातचे कामही गेले.

नागपूर :  राजाने मारले, पावसाने झोडपले तर फिर्याद तरी कुठे करायची असा सवाल उभा राहतो तेव्हा उत्तरच सापडत नाही.. हाच प्रसंग आता हातमजुरांवर उभा ठाकला आहे. आठ दिवसांपासून हाताला काम नसल्याने घरातील अन्नधान्यही संपत आहे. सरकारने पॅकेजची घोषणा केली असली तरी ते कधी आणि कसे मिळेल हे माहिती नाही. त्यामुळे अशीच स्थिती राहिली तर करोना विषाणू आधी भूकच आमच्यासारख्यांचा जीव घेईल, अशी भीती मजूर व्यक्त करीत आहे.