करोनाचा धसका : टेम्पोतून जीवघेणा प्रवास, ४६ जणं पोलिसांच्या ताब्यात

करोनाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र देशाच्या अनेक भागात या अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहनं परिस्थितीचं गांभीर्य न ओळखता प्रवासी वाहतूक करत असल्याचं समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदीदरम्यान एका टेम्पोवर कारवाई केली, ज्यात ७ लहान मुलांसोबत ४६ कामगार आढळून आले. हे सर्व कामगार कर्नाटकमधील बेळगाव या भागातले आहेत, मुंबईतील सांताक्रूझ भागात हे काम करत होते. सर्व कामगारांना खाली उतरवल्यानंतर पोलिसांनी टेम्पो मालक आणि चालकावर गुन्हा दाखल केला आहे.