पराभव समोर दिसू लागल्याने भाजप उमेदवाराकडून पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे

आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिली. नक्कीच त्या राज्यघटनेप्रमाणे येथील कारभार होत नाही असे दिसून येत आहे. पोलीस देखील चुकीच्या पद्धतीने वागत असून चुकीच्या पद्धतीचा पायंडा पाडला जात आहे. कार्यकर्ते ,पत्रकार अशा सगळ्यांना धमक्या दिल्या जात आहेत . विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने फेक नेरेटिव्ह सेट केले जात आहे . आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो ही नक्कीच हुकूमशाही आहे.
……..
साहेबांची सभा होऊ नये म्हणून विरोधी उमेदवाराने आकाश पातळ एक केले…!
अजित गव्हाणे म्हणाले, भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली. मात्र ही सभा होऊ नये यासाठी विरोधी भाजप उमेदवाराने आकाश पातळ एक केले. अपक्ष उमेदवाराला या मैदानावर सभा घ्यायची आहे म्हणून अर्ज देण्यात आला. या अर्जावर खोटी सही होती. अनेक दिवस सभेच्या मंजुरीबाबत खेळवण्यात आले. हा प्रकार साहेबांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना फोन केले. ” मी भोसरी विधानसभेत येतोय तुमची काही अडचण आहे का?” अशी विचारणा जेव्हा साहेबांनी केली तेव्हा हे मैदान आमच्यासाठी मंजूर करण्यात आले. यातून एकच सिद्ध होते विरोधी उमेदवारांना त्यांचा पराभव आता दिसू लागला आहे.
……
बटेंगे कटिंग असे म्हणत या ठिकाणी निवडणुकीला धार्मिक रंग दिला जात आहे.मात्र आम्ही सुद्धा हिंदू आहोत. आम्हाला आमच्या जातीचा, धर्माचा अभिमान आहे. तसाच आम्हाला इतर धर्माचा देखील तेवढाच अभिमान आहे. कोणताही धर्म, जात हे शिकवत नाही की दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करा. भारत मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. सर्वांना गुण्यागोविंदाने येथे राहणे अपेक्षित आहे. तरच आपला देश विकसित राष्ट्र होऊ शकतो.
अजित गव्हाणे
उमेदवार महाविकास आघाडी
भोसरी विधानसभा मतदारसंघ
…………