Sakhi news live sayali kulkarni
विधानसभेचे पडघम येत्या काही दिवसात वाजायला सुरुवात होईल यातच पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो मुस्लिम बांधवांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्य कर्तृत्वावर विश्वास ठेवत पिंपरी चिंचवड शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात शिवसेना भवन, दादर मुंबई येथे प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांच्या कार्यकाळात शिवसेनेने जोरदार इंनकमिंग सुरू झाली. यामध्ये पिंपरी चिंचवड मधील बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये भाजप युवा मोर्चाचे चेतन पवार, राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे, भाजपचे एकनाथ पवार यांचा समावेश आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता शेकडो मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद आणखी वाढल्याची पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांचे कार्य आणि त्यांची असलेली सर्वसमावेशक भूमिका यावर आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात कार्यरत राहून धेय्यधोरणे पोचवण्यासाठी काम करणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या. बरकत शेख, मुख्तार शेख, कुदरत शेख, भाजपचे यासीन शेख, जुनेद शेख, अरबाज शेख, अशपाक शेख, अयातुलाह सय्यद, किरण सामंत, मौलाना अब्दुल समद, मौलाना मुख्तार शेख, भाजपचे रशीद शेख, इरफान शेख, भाग्यश्री गरुळे, आकांक्षा गरुळे यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधवांचा समावेश आहे. कोट :मा. उध्दव ठाकरे साहेबांची लोकप्रियता आणि कार्य यावर विश्वास ठेऊन अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. पिंपरी चिंचवड मधील मुस्लिम बांधवांनी देखील माझ्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवण्यास हातभार लावला आहे. त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शिवसेनेची ताकद निश्चितच वाढली आहे. मुस्लिम बांधवांनी जो काही विश्वास दाखवला त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही. ॲड. सचिन सुरेश भोसले पिंपरी चिंचवड शहरप्रमुख शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पडघम येत्या काही दिवसात वाजायला सुरुवात होईल यातच पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो मुस्लिम बांधवांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्य कर्तृत्वावर विश्वास ठेवत पिंपरी चिंचवड शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात शिवसेना भवन, दादर मुंबई येथे प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांच्या कार्यकाळात शिवसेनेने जोरदार इंनकमिंग सुरू झाली. यामध्ये पिंपरी चिंचवड मधील बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये भाजप युवा मोर्चाचे चेतन पवार, राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे, भाजपचे एकनाथ पवार यांचा समावेश आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता शेकडो मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद आणखी वाढल्याची पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांचे कार्य आणि त्यांची असलेली सर्वसमावेशक भूमिका यावर आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात कार्यरत राहून धेय्यधोरणे पोचवण्यासाठी काम करणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
बरकत शेख, मुख्तार शेख, कुदरत शेख, भाजपचे यासीन शेख, जुनेद शेख, अरबाज शेख, अशपाक शेख, अयातुलाह सय्यद, किरण सामंत, मौलाना अब्दुल समद, मौलाना मुख्तार शेख, भाजपचे रशीद शेख, इरफान शेख, भाग्यश्री गरुळे, आकांक्षा गरुळे यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधवांचा समावेश आहे.
कोट :
मा. उध्दव ठाकरे साहेबांची लोकप्रियता आणि कार्य यावर विश्वास ठेऊन अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. पिंपरी चिंचवड मधील मुस्लिम बांधवांनी देखील माझ्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवण्यास हातभार लावला आहे. त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शिवसेनेची ताकद निश्चितच वाढली आहे. मुस्लिम बांधवांनी जो काही विश्वास दाखवला त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही.
ॲड. सचिन सुरेश भोसले
पिंपरी चिंचवड शहरप्रमुख
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)