शबनम न्यूज’चा दशकपूर्ती सोहळा उत्साहात
पत्रकारांच्या प्रश्नांवर हिवाळी अधिवेशनापूर्वी ‘आनंदाची बातमी’ – आ. शंकर जगताप
‘अंतर्नाद’च्या कलाकारांची उपस्थिती ठरली विशेष आकर्षण; मान्यवरांच्या उपस्थितीत १० व्या वर्धापनदिनाचा केक कापला

पिंपरी चिंचवड : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, सामाजिक बांधिलकी जपत निर्भीड आणि प्रभावी पत्रकारितेची वाटचाल करणाऱ्या ‘शबनम न्यूज मीडिया ग्रुप’चा १० वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. खराळवाडी येथील कृष्णा पॅलेसच्या सुदामा हॉलमध्ये सोमवारी (३१ ऑगस्ट २०२६) आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्याला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कामगार आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते ‘अंतर्नाद’ या मराठी संगीतमय नाटकाच्या संपूर्ण टीमची उपस्थिती. नाटकातील कलाकार तसेच पडद्यामागील विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या टीमच्या सदस्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची रंगत वाढवली. ‘अंतर्नाद’च्या टीमच्या उपस्थितीने स्नेहमेळाव्यातील वातावरण अधिकच उत्साहपूर्ण झाले.
महापालिका विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते आणि विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शबनम न्यूज’च्या १० व्या वर्धापनदिनाचा केक कापण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमात ‘शबनम न्यूज’च्या विशेषांकाचे प्रकाशन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
पत्रकारांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक – आ. शंकर जगताप
वर्धापन दिन विशेष अंकाचे प्रकाशन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार शंकर जगताप यांनी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. राज्यातील पत्रकारांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर महायुती सरकार सकारात्मक असून, येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पत्रकारांसाठी आनंदाची बातमी मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदार जगताप म्हणाले, “लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शबनम न्यूजने ही जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली असून, त्यांच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त संपूर्ण शबनम न्यूज परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
पत्रकारांच्या निवास, आरोग्यसेवा, मुलांचे शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देण्याबरोबरच विधानसभेतही पत्रकारांच्या प्रश्नांवर आवाज उठविला असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने महासंघाची प्रक्रिया
पत्रकारांच्या प्रश्नांना संघटित आणि संस्थात्मक पातळीवर हाताळण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने महासंघ आणि समिती स्थापन करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी आमदार शंकर जगताप यांनी केली. त्यामुळे राज्यातील पत्रकारांना शासनाशी संवाद साधण्यासाठी अधिक प्रभावी आणि सक्षम व्यासपीठ उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दशकभराच्या वाटचालीत शबनम न्यूजने स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकारिता करण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांच्या समस्या, शहरातील विकासकामे, प्रशासनाच्या कामकाजावर भाष्य तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींना व्यासपीठ देण्याचे काम शबनम न्यूजने सातत्याने केले आहे.
मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती
या स्नेहमेळाव्याला आमदार उमाताई खापरे, महापालिका विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका प्रियांका कुदळे, नगरसेवक सुरेश भोईर, तुषार शहाणे, नगरसेविका अर्चना तापकीर, कामगार नेते यशवंत भोसले, कामगार नेते इरफानभाई सय्यद, दीपक भोंडवे, राष्ट्रवादी च्या महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर , ‘अंतर्नाद’ नाटकाची संपूर्ण टीम, मराठी साहित्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष राजन लाखे नगरसेवक फजल शेख, नगरसेविका वर्षा जगताप, युवा नेते निखिल दळवी, कवयित्री कमल सोनजे, अंजू सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, युवा नेते मयूर काळभोर, ओम साई फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संजय मराठे, वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य संभाजी बाळासाहेब बारणे, युवा नेते राहुल गरड, काँग्रेसच्या डॉक्टर मनीषा गरुड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सिंग वालिया, राष्ट्रवादीचे अकबर भाई मुल्ला, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक बापूसाहेब गोरे, संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते साहूल हमीद शेख, सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख, वृत्तपत्र विक्रेते अनिल दळवी, देहू चे ह भ प सांगळे महाराज, शिवसेना युतीच्या श्वेता कापसे, प्रभात च्या प्रतिनिधी संगीता पाचंगे, पुढारी वृत्तपत्राचे पत्रकार संतोष महामुनी, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे सदस्य संतोष जराड, बाबू कांबळे, सुरज साळवे, मुकेश जाधव, युनूस खतीब, राष्ट्रवादी युवती पुणे च्या साक्षी खवळे, , काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शाबुद्दीन शेख, राष्ट्रवादीचे रशीद भाई सय्यद, शकृल्ला भाई पत्रकार मुजफ्फर इनामदार, दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या संस्थापक दुर्गा भोर व त्यांचे सहकारी, क्रीडापटू श्रद्धा शेलार, अहिल्यानगर सोनई चे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मकबूल शेख. पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आलेल्या सर्व पाहुण्यांचे शबनम सय्यद यांनी स्वागत केले, सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या तसेच गजाला सय्यद यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शबनम न्यूज मीडिया ग्रुप टीमचे फरदीन सय्यद, आसिया इनामदार, सानिया सय्यद, जाकीर खान यांनी विशेष परिश्रम घेतले घेतले
