*आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशाला केराची टोपली*

पिंपरी महापालिकेच्या या “उर्मट”अधिकाऱ्यावर कारवाई होणार का?
पिंपरी-(प्रतिनिधी)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिस्तप्रिय आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश धुडकावून लोकप्रतिनिधींच्या कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या महापालिकेच्या “उर्मट”अधिकाऱ्यावर कारवाई होणार का?असा प्रश्न कार्यक्रमात उपस्थित असणारे अनेक राजकीय कार्यकर्ते विचारात आहेत.
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेच्या अनेक चुकीच्या पद्धती बंद व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.यापैकी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन कालावधीत लोकप्रतिनिधींच्या कार्यालयास जाऊ नये अश्या प्रकारचा आदेश पारित केला.त्याचा परिणाम म्हणून महापालिकेचे 99% टक्के अधिकारी व कर्मचारी हे लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात जाण्याचे बंद झाले त्यामुळे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रीपणा आला.मात्र आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम काही “उर्मट” अधिकारी करीत आहेत. त्यामध्ये महापालिका जल:निस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल शिंदे यांच्या काही अधिकारी आहेत.वरील छायाचित्रामध्ये कार्यकारी अभियंता अनिल शिंदे हे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत आज दुपारी 1.30 ते 3.30 या दोन तासांच्या वेळेत ऐका लोकप्रतिनिधीच्या कार्यक्रमात मिरविताना दिसून आले. ना नागरिकांचे भय ना महापालिका आयुक्तांचे भय.गळ्यात महापालिकेचे ओळखपत्र घालून बिनधास्त पुढाऱ्याच्या तोऱ्यात फिरताना सर्वजण पाहत होते. या अधिकाऱ्यांचा कार्यक्रमातील वावर पाहून उपस्थित अनेक कार्यकर्ते,नगरसेवक त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते.
शिस्तीचा भंग करणाऱ्या या “उर्मट” अनिल शिंदे यांच्यावर आयुक्त राजेश पाटील काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.