आगामी काळात कविताताई भोंगाळेच्या सामाजिक उपक्रमांना भाजपा महिला मोर्चा च्यावतीने सर्वोतपरी सहकार्य करु . उमाताई खापरे*

कविताताई युवा मंचच्या वतीने सखुबाई उद्यान भोसरी येथे उभारलेल्या माणुसकीचे भिंत या सामाजिक उपक्रमाचा लोकार्पण सोहळा भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी बोलतांना उमाताई खापरे म्हणाल्या की कविताताई भोंगाळे यांनी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाज कार्यातून राजकारणाकडे या उव्क्तीला खऱ्या अर्थाने सार्थक ठरली असून भाजपा महिला मोर्चा आगामी काळात त्याच्या सामाजिक कामाला त्याच्या बरोबर सदैव राहील.
भोसरी परिसरात कविताताई भोंगाळेच्या वतीने हाती घेतलेल्या माणुसकीची भिंत हि संकल्पना गरजूंच्या चेहऱ्यावर हसू आणणारी ठरत आहे. दिवसरात्र काबाड कष्ट करूनही अंगभर कपडे न मिळणारा, रखरखत्या उन्हात, थंडीत फाटक्या तुटक्या कपड्यांसह फिरणाऱ्या समाजातील गरजूंच्या मदतीला हि भिंत येतांना दिसून येते आहे.
सामाजिक क्षेत्रात भोसरीकर नेहमीच अग्रेसर असतात. समाजातील गरजू आणि अपेक्षित घटकांसाठी मदत करणाऱ्यांची संख्या येथे मोठी आहे. समाजासाठी आपण ही काहीतरी करावे या सामाजिक उद्देशाने कविताताई भोंगाळे यांच्यासोबत शेकडोंच्या संख्खेने नागरिक या उपक्रमात सहभागी होताना दिसत असून काही दिवसांपूर्वी इंदुबन सोसायटी दिघी रोड येथे मंचच्या वतीने उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीच्या ठिकाणी कपडे घेवून जाणार्यांपेक्षा देवून जाणार्यांची संख्या दुप्पट असून जमा होणारी कपडे मंचाच्यावतीने शहरातील गरजूंपर्यंत पोहचवली जाणार असल्याची माहिती कविताताई भोंगाळे यांनी दिली.
या प्रसंगी उपमहापौर हिरानानी घुले,भाजपा पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडी शहराध्यक्षा राजश्री जायभाये, भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा राजश्री शहा,विजया भोंगाळे, सोनाली गोरे, सुवर्णा गावंडे, सारंगा ठाकूर, संगीता इंगळे,राजश्री ढगे,मनीषा गंगणे,यमुना फुलउंबरकर,पुष्पलता आढाव,आदी मान्यवर उपस्थित होते. सौ.सरिता विखे पाटील यांनी आभार मानले