Sunday, May 3, 2026
Latest:
बातम्या

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या बैठकीत महत्त्वाचे ” निर्णय “

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या बैठकीत महत्त्वाचे ” निर्णय “

पिंपरी-(प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची आज महत्वपूर्ण विषयावर बैठक घेण्यात आली असून बैठकीत पत्रकारांसाठी “आपत्कालीन निधी” उभारने,गैरवर्तन करणाऱ्या चार सदस्यांचे निलंबन करून त्यांच्या जागी नव्याने चार सदस्यांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कै भा.वि.कांबळे पत्रकार कक्षात पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची आज सांयकाळी 04.30 वाजता बैठक घेण्यात आली असून बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले हे होते. पत्रकार संघाच्या सदस्यांसाठी “आपत्कालीन” निधी उपलब्ध करणे,गैरवर्तन केल्याबद्दल काही सदस्यांचे सर्वानुमते निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्याजागी खजिनदार पदी सुनील उर्फ बाबू कांबळे,कलिंदर शेख व दिलीप देहाडे उपाध्यक्ष,व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प्रमुखपदी दिनेश दुधाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या वेळी सोशल मीडिया पतिषदेच्या राज्य प्रमुख बापूसाहेब गोरे,जिल्हा प्रतिनिधी दादाराव आढाव,माजी अध्यक्षा सायली कुलकर्णी,सोशल मीडिया परिषदेचे अध्यक्ष सूरज साळवे पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.