*ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन उद्योगविश्वाचे मोठे नुकसान*

सखी न्युज लाइवं
सायली कुलकर्णी
मुंबई, दि. ०९ : ज्येष्ठ उद्योगपती व उद्योगात येऊ घातलेल्या तरुणाईचे गॉडफादर रतन टाटा यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने उद्योगविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.
उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानं,रतन टाटा यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ शाहरुख असपी गोळवाला यांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू होते. ब्रीच कॅन्डी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील,चौथा मजला हा रतन टाटा यांच्यासाठी राखीव होता
28 डिसेंबर 1937 साली जन्म झालेले रतन टाटा अविवाहित होते
– रतन टाटा यांनी आपल्या संपत्तीतील 65 टक्के संपत्ती समाजकार्यासाठी दान दिली.
– या दशकातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून रतन टाटा यांचा आदराने उल्लेख केला जातो.
– रतन टाटा यांनी 1961 साली टाटा समूहात काम सुरू केलं
– टाटा स्टील या कंपनीत शॉप फ्लोअर वर त्यांनी प्रथम काम केलं
वारसदार म्हणून 4 नावं चर्चेत –
– रतन टाटा यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि त्यांचे चुलतभाऊ नोएल टाटा
– टाटा गृपमधिल अनेक कंपन्यांतील एक महत्वाचे नाव असलेल्या 34 वर्षीय माया टाटा
– स्टार बाजारचे प्रमुख 32 वर्षीय नेविल टाटा
– इंडीयन हॉटेलचे प्रमुख 39 वर्षीय लीह टाटा

रतन टाटा यांच्याबाबत काही विशेष –
– आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार प्रदान करून रतन टाटा यांचा गौरव करावा, या मागणीने मोठा जोर पकडला होता
– हायकोर्टात या मागणीसाठी चक्क याचिकाही दाखल झाली होती
– दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेण्यास विनम्र नकार दिला होता
– तरीही ही मोहीम जोरात सुरू होती
– मात्र,स्वतः रतन टाटा यांनी पुढाकार घेऊन हे सर्व थांबवा … अशी जाहीर विनंती केली होती
– 2008 मधे,रतन टाटा यांचा आपल्या देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्वविभूषण प्रदान करून गौरविण्यात आलं होतं
– ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया,ऑर्डर ऑफ ब्रिटिश या आंतरराष्ट्रीय सन्मानानेही रतन टाटा यांचा गौरव करण्यात आले