पिंपरी चिंचवड शहरासाठी १८ अग्निशामक केंद्राची गरज आहे!महापालिका उपायुक्त मनोज लोणकर यांची माहिती

पिंपरी चिंचवड शहरासाठी १८ अग्निशामक केंद्राची गरज आहे!
महापालिका उपायुक्त मनोज लोणकर यांची माहिती
सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णी
पिंपरी( प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता एकूण १८ अग्निशामक केंद्राची गरज असून सध्या केवळ ८ अग्निशामक केंद्र अस्तित्वात असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख मनोज लोणकर यांनी माझी सखी live शी बोलताना दिली आहे.
शहरात अपघात,सिलेंडर स्फोट, फायर कॉल्स,विजेच्या दुर्घटना,रस्त्यावर ऑईल गळती,पक्षी अडकणे, नदी पात्रात बुडालेल्या घटना अशा अनेक दुर्घटना घडल्यास पहिला कॉल अग्निशामक केंद्राकडे येतो आणि मग पळापळ सुरू होती ती अग्निशमन दलातील तैनात असलेल्या फायरमन यांची. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन शक्य तेवढी मदत केली जाते.
महापालिकेच्या दिमतीला सध्या ८ अग्निशमन केंद्र कार्यरत असून एका अग्निशमन गाडीवर एक वाहन चालक,४ एकूण 18 फायरमॅन आणि एक फिल्डींग फायरमॅन अशी तयारी केलेली असते.यावर्षी १४ नवीन गाड्या खरेदी केल्या असून सर्व गाड्या ३० ते ४० लाख रुपये किमतीच्या आहेत.
सध्या चोविसावाडी,डॉ हेगडेवार भवन प्राधिकरण आणि पिंपरी महापालिका मुख्य इमारत पिंपरी अशा तीन ठिकाणी नव्याने सर्व सुविधायुक्त अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. तर इतर अग्निशमन केंद्र उभरण्यासाठी जागा शोधण्याचे काम सुरू असल्याचे ही श्री लोणकर यांनी सांगितले.
अग्निशामक विभागातील अधिक कामकाजाबाबत माहिती देताना श्री लोणकर म्हणाले की ” या विभागातर्फे शहरातील दुर्घटनामध्ये वित्त आणि जीवित हानी यांचे रक्षण करणे हे मुख्य कार्य असेल तरी याच विभागातर्फे नव्याने इमारत बांधण्यासाठी ना हरकत दाखला दिला जातो त्याद्वारे महापालिकेला उत्पन्न मिळत असल्याचेही श्री लोणकर यांनी सांगितले.