*आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळून देण्याचा मनसैनिकांचा निर्धार*

सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णी
आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळून देण्याचा मनसैनिकांचा निर्धार..
शिरूर : शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर – हवेली मतदार संघातून मोठे मताधिक्क्य मिळवून देण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. मनसैनिकांच्या पाठिंब्यामुळे माझी ताकद वाढली असून, राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे तरूणांची ताकद प्राप्त होणार असल्याचे आढळराव पाटील यांनी नमूद केले.
मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर व हवेली तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वाघोली येथे झालेल्या नियोजन बैठकीत आढळराव पाटील यांना मोठे मताधिक्क्य मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी मनसेचे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, उपाध्यक्ष महिबूब सय्यद, काका गायकवाड, किरण गव्हाणे, सविता दरेकर, ॲड. राहुल कदम, शिरूर तालुकाध्यक्ष तेजस यादव, अविनाश घोगरे, वींद्र गुळादे, हवेली तालुकाध्यक्ष चेतन चौधरी, शिरूर शहर अध्यक्ष ॲड. आदित्य मैड, सचिव रवीराज लेंडे, संतोष नरके, सुनिल दरेकर, धर्मा गावडे आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.