बातम्या *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिंचवडमध्ये आज* November 6, 2024 Editor करणार ‘शंखनाद’ ;शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची पहिलीच प्रचार सभाकस्पटे वस्ती, काळेवाडी फाटा येथे सायंकाळी ६ वाजता होणार सभेला प्रारंभचिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राहणार उपस्थितसभेला मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित राहण्याचे चिंचवडकरांना आवाहनचिंचवड : प्रतिनिधी,सखी न्यूज लाईव्हसायली कुलकर्णी6नोव्हेंबर २०२४ – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा बुधवारी काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती येथील अँबियन्स हॉटेल शेजारील मैदानात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची ही पहिलीच प्रचार सभा संपन्न होणार आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढील 6 दिवसात 21 सभा घेणार आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातही या सभा होणार आहेत. या सभांचा शुभारंभ उद्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील काळेवाडी फाटा येथील सभेतून होणार आहे.या सभेला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले) यांच्यासह मित्रपक्ष महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या सभेसाठी महायुतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे. Post Views: 44