पिंपरी-चिंचवड : करोनाबाधित, संशयित, परदेशातून आलेल्या नागरिकांच्या परिसरात औषधांची फवारणी

सोडिअम हायपोक्लोराईट व बॅक्टोडेक्सची फवारणी करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणू ने ऐकून १२ जण बाधित आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरात उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाकडून शहरात निर्जंतुकीकरण करणं सुरू आहे. रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत हे काम सुरू असून अग्निशमन वाहनांनी याची फवारणी केली जात आहे. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून एक ही करोना बाधित आढळलेला नाही. करोना चा प्रादुर्भाव होऊ नये हे लक्षात घेता आरोग्य विभागाने हा उपक्रम हाती घेतला असून सोडिअम हायपोक्लोराईट व बॅक्टोडेक्सची फवारणी करण्यात येत आहे.