बातम्यामहाराष्ट्र

प्रभाग 32 मध्ये मोफत वाय-फाय योजनेला सुरुवात;डॉ धम्मरत्न गायकवाड यांची डिजिटल क्रांतीच्या दिशेने वाटचाल.

सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णी
प्रभाग 32 मध्ये मोफत वाय-फाय योजनेला सुरुवात;डॉ धम्मरत्न गायकवाड यांची डिजिटल क्रांतीच्या दिशेने वाटचाल.*../सांगवी(प्रतिनिधी ) दिनांक 4 डिसेंबर 2025:– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संविधान दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 32 मध्ये एक महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला आहे. डॉ. धम्मरत्न गायकवाड यांनी नागरिकांसाठी मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या योजनेची सुरुवात करत प्रभागाच्या डिजिटल प्रगतीला नवी दिशा दिली आहे.

संविधानाने दिलेल्या माहितीच्या हक्काचा आणि डिजिटल सशक्तीकरणाचा विचार करत या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मोफत वाय-फाय सुविधा सुरू झाल्यानंतर प्रभागातील अनेक परिसरांमध्ये इंटरनेटचा वेग आणि उपलब्धता सुधारणार असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः तरुणवर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रभाग क्रमांक 32 मधील नागरिकांना अटी व शर्तीच्या अधीन राहून सेवा पुरवली जाणार असून प्रभागातील नागरिक योजनेचे अर्ज दाखल करत आहेत. मंदिर, बौद्ध विहार, चर्च या सारख्या धार्मिक स्थळांना सुद्धा मोफत वाय-फाय सेवा दिली जाणार आहे.विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण, स्पर्धा परीक्षा तयारी, ई-सेवा, शासनाच्या विविध योजना आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा सहज लाभ मिळावा हा या योजनेमागील मुख्य उद्देश असल्याचे डॉ. धम्मरत्न गायकवाड यांनी सांगितले.

डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या संकल्पनेला अनुसरून प्रभाग 32 मध्ये डिजिटल सुविधांचे जाळे मजबूत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक पाऊल पुढे मानला जात आहे. संविधान दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी ही योजना सुरू करून नागरिकांना डिजिटल स्वरूपातील “स्वातंत्र्य” देण्याचा प्रयत्न असल्याचे बहीण डॉ. प्रज्ञा गायकवाड यांनी यावेळी नमूद केले.

या योजनेमुळे प्रभाग क्रमांक 32 लवकरच पूर्णपणे स्मार्ट आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम विभाग म्हणून पुढे येईल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे