बातम्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाची ५०१ कोटीची कामगिरी! December 16, 2022December 16, 2022 Editor पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाची ५०१ कोटीची कामगिरी! Sakhi news live.in sayali kulkarniपिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरातील तीन लाख मिळकतधारकांनी साडेआठ महिन्यांत ५०१ कोटी रुपयांचा मिळकतकर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. महापालिकेच्या करसंकलन विभागाने जाहीर केलेल्या विविध सवलत योजना व जप्तीच्या मोहिमेमुळे विक्रमी वसुली झाली आहे. उर्वरित मिळकतधारकांनी कर भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.पालिकेकडे शहरातील ५ लाख ८८ हजार मिळकतींची नोंद आहे. एक एप्रिल ते १३ डिसेंबर २०२२ असे साडेआठ महिन्यांत ३ लाख १ हजार ४३४ मिळकतधारकांनी ५०१ कोटी ४० लाख रुपयांचा भरणा केला आहे. विभागाने ३१ मार्च २०२३ पर्यंत १ हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किमान ८५ टक्के मिळकतींचा कर वसूल करणे आवश्यक आहे. तो पल्ला गाठण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करसंकलन विभागाने कंबर कसली आहे.शहरातील पाच लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक १ हजार ३६१, ५० हजारांपुढील थकबाकीदार २६ हजार ७६० आणि एकदाही कर भरणा न केलेल्या ३ हजार ८५० अशा एकूण ३१ हजार ९७१ मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच, तीन लाख निवासी मिळकतधारकांकडे ५८३ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. वारंवार आवाहन करून नागरिक बिल भरत नसल्याने पालिकेने नाईलाजाने कठोर भूमिका घेत जप्तीची मोहीम राबवली. जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांतील साडेआठ महिन्यांत ५०१ कोटी रुपयांचा कर वसूल झाला आहे. मात्र, अद्यापही लक्ष गाठणे बाकी आहे. नागरिकांनी बिलाचा भरणा करून पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पालिकरा आयुक्तांनी केले आहे.प्रगतशील करसंकलन विभागाला खीळ घालण्याचा प्रयत्न!तृतीयपंथीयांना सन्मान मिळावा ते मुख्य प्रवाहात यावेत यासाठी आमच्या विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.त्यांना वेगळे गणवेश शिवून आणले व करसंकलन विभागात त्यांना १५ ऑगस्ट ते १७ नोव्हेंबर या दरम्यान थकीत करवसुली चे काम दिले मात्र काही मंडळी कडून त्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नीलेश देशमुख यांनी सांगितले. Post Views: 286