प्रशासना विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक महासंघाच्यावतीने निषेध आंदोलन” करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक महासंघाच्यावतीने शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन येथे रस्त्यावरील खड्डयांमुळे शाहूनगर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासना विरोधात शहराध्यक्ष श्री. अजित दामोदर गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात व शहरातील प्रमुख नेते मंडळी यांच्या उपस्थितीत “निषेध आंदोलन” करण्यात आले.
यावेळी महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट, वाहतूक महासंघ अध्यक्ष काशिनाथ जगताप, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, युवकअध्यक्ष इम्रान शेख, दत्तात्रय जगताप, अकबर मुल्ला , कविता खराडे, मिरा कदम, दिपाली देशमुख, सविता धुमाळ, दिलीप शिंगोटे, रविंद्रकुमार भडाळे, मंगेश खंडागळे, सागर भुजबळ, योगेश सोनावणे, रविंद्र शिंदे, नितीन बुगासे, जयश्री जोगदंड, युवराज पवार, झिन्नत इनामदार, राजेश हरगुडे, प्रदीप गायकवाड, विजय दळवी. इत्यादी पदाधिकारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते.