बातम्या *पिंपरीसाठी २०, भोसरीसाठी २३ तर चिंचवडसाठी २४ फेऱ्या..* November 22, 2024November 22, 2024 Editor प्रतिनिधी – सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णीपिंपरीसाठी २०, भोसरीसाठी २३ तर चिंचवडसाठी २४ फेऱ्या..मतमोजणी पूर्ण होऊन दुपारी तीनपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता…पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात तर, चिंचवड मतदारसंघासाठी थेरगावातील शंकर गावडे कामगार भवन येथे होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया शनिवारी (दि.२३) सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. मतमोजणी पूर्ण होऊन दुपारी तीनपर्यंत निकाल समजेल, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.मतदान बुधवारी (दि.२०) झाले. आता निवडणूक विभागाकडून मतमोजणीसाठी मतमोजणी कक्षाची तयारी सुरू झाली आहे. मतमोजणी टेबलांची रचना करण्यात येत आहे. टेबल कर्मचारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलसाठी तीन मोजणी अधिकारी, एक शिपाई असे चार जणांचे एकेक पथक आहे. मोजणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले आहे.पिंपरीसाठी २० टेबलांवर मतमोजणी होणार असून, त्याच्या २० फेऱ्या होणार आहेत. चिंचवडसाठी २९ टेबलांवर मतमोजणी प्रक्रिया होईल. त्यांच्या एकूण २४ फेऱ्या होणार आहेत. भोसरीच्या मतमोजणीसाठी २२ टेबलांवर २३ फेऱ्या होतील. टपाली व इलेक्ट्रोल व्होटच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र मोजणी पथकेही नेमण्यात आली आहेत.मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मतदारांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे दुपारी बारानंतर निकालाचा कल स्पष्ट होईल. दुपारी दोनपर्यंत संपूर्ण निकाल हाती येऊ शकेल. Post Views: 105