पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा दणदणीत विजय…

*
प्रतिनिधी – सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णी
पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा दणदणीत विजय…
ठेवता
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२४) :- राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांचा दणदणीत विजय झाल्यात जमा आहे.
आतापर्यंत एकूण वीस पैकी १८ फेऱ्या झाल्या असून त्यांना ३६,५७८ इतक्या मतांची आघाडी मिळाली आहे. अजून फक्त दोन फेऱ्या बाकी आहेत. सुरवातीपासून त्यांनी मतांची आघाडी राखली त्यामुळे त्यांचा विजय पक्का झाला. त्यांच्या विजयामुळे पिंपरीतील भाजपसह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे.
पिंपरी विधानसभा निवडणुकीचा निकाल आज शनिवारी जाहीर होत आहे. पिंपरी विधानसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवार हे महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे तर, प्रमुख विरोधक महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत या आहेत.
अठराव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे यांना १०१,९३१ तर, शीलवंत यांना ६५,३५३ इतकी मते मिळाली आहेत. अठराव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे ३६,५७८ इतक्या मतांनी आघाडीवर आहेत. अजून दोन फेऱ्या बाकी आहेत.