*सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने ब्राह्मण सामर्थ्य संमेलनाचे आयोजन*

पिंपरी प्रतिनिधी
सखी न्यूज लाईव्ह
सायली कुलकर्णी
सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने 21 ऑक्टोबर रोजी भव्य ब्राह्मण सामर्थ्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला समाजातील सर्व लोकांनी आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती या प्रेस नोटीद्वारे करण्यात येत आहे.
कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता श्री राहुल सोलापूरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू, श्री सत्यकी सावरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने काही सन्माननीय व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने करण्यात येईल, ज्यामध्ये उपस्थितांना एकत्र येण्याची संधी मिळेल. तरी सर्व पत्रकारांना विनंती आहे की, त्यांनीही या महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्याची वृत्तांत प्रसिद्ध करावा.
कार्यक्रमाचा तपशील:
तारीख: 21 ऑक्टोबर 2024
वेळ: संध्याकाळी 6:00 ते 9:00
स्थळ: आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी (वायसीएम हॉस्पिटल शेजारी)
सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून ब्राह्मण समाजाच्या एकतेला बल देण्यास सहकार्य करावे.
संपर्क: श्री अभय ओरपे
मोबाईल: 9881009806