माजी विरोधी पक्षनेते ,नगरसेवक दत्ता साने यांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पिंपरी चिंचवड (दि. २९) –  पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात आले आहेत. प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमान नगरसेवक व माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांच्या माध्यमातून प्रभागातील अनेक नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.