#CORONAVIRUS : नगरसेविका मनिषा ताई पवार यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 23 मध्ये कीटकनाशक औषधाची फवारणी

पिंपरी-चिंचवड ( दि. 29 मार्च ) – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू असताना प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे .पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सभापती व विद्यमान नगरसेविका मनिषा ताई पवार यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याला कोणत्या प्रकारचा धोका निर्माण होऊ नये, याकरिता उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण प्रभागात मनीषाताई पवार यांच्या माध्यमातून कीटकनाशक औषधाची फवारणी करण्यात येत आहे.