स्वास्थ कॉल सेंटर २४ तास सुरु राहणार महापौर माई ढाेरे यांच्या हस्ते उद्घाटन*
पिंपरी सखी न्युज लाईव्हगृह : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोवीड १९ पॉझिटीव्ह रुग्णाच्या घरी स्वतंत्र शौचालय व स्वतंत्र अलगीकरणाची व्यवस्था असल्यास व कोणतीही लक्षणे नसणा-या रुग्णांच्या सोईसाठी महानगरपालिकेच्या स्वास्थ कॉल सेंटर यंत्रणेचे उद्घाटन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी कॉल सेंटर मधील यंत्रणेतून महापौर यांनी स्वत: कोरोनाबाधित रुग्णासोबत फोनद्वारे थेट संवाद साधून रुग्णाच्या तब्येतीची विचारपुस केली.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, उपायुक्त सुभाष इंगळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.
वॉर रुममध्ये तयार केलेल्या या कॉल सेंटरमधून पहिल्या दहा दिवसापर्यंत कॉल सेंटर द्वारे गृह अलगीकरणात (होम आयसोलेशन) मध्ये असणा-या रुग्णांची दिवसातून दोन वेळा फोनद्वारे विचारपुस करण्यात येणार असून त्यादरम्यान लक्षणे आढळलेल्या रुग्णांना नजिकच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयाकडे पाठविण्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येणार आहे.
कोवीड पॉझिटीव्ह असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी हे स्वतंत्र कॉल सेंटर सुरु करण्यात आले असून हे २४ तास सुरु असणार आहे. गृह अदगीकरणात असणा-या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असल्यास त्यासाठी स्वास्थ्य हेल्पलाईन ०२०-६७३३११४० / ०२०-६७३३११४३ वर संपर्क साधण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी गृह अलगीकरणात असणा-या नागरिकांनी या सुविधेचा वापर करावा असे आव्हान महापौर उषा ऊर्फ माई ढोरे आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले .