पिंपरी महापालिकेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा “राडा”

पिंपरी | प्रतिनिधी |sakhinewslive

शिस्तबद्ध पक्ष म्हणून स्वतःची प्रतिमा सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहरातील निष्ठावंत पदाधिकाऱ्यांमध्ये काल “राडा” झाला असून
नेमके कारण न समजल्याने उलट सुलट चर्चा सुरू होती.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके यांचे पिंपरी महापालिकेच्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावरील कार्यालय आहे. काल सांयकाळी नामदेव यांच्या या कार्यालयाच्या “अँटीचेंबर” मध्ये नामदेव ढाके व स्वीकृत नगरसेवक मोरेस्वर शेडगे,माजी नगरसेवक राजू दुर्गे यांच्यात जोरजोरात “बोलण्याचा ” आवाज येऊ लागला.”आरे-तुरेच्या” जोराच्या आवाजाने पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील नागरिक,कर्मचारी,विविध पक्षाचे कार्यकर्ते यांनी ढाके यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली,मात्र आवाज “अँटीचेंबर” मधून येत असल्याने नेमके काय बोलणे सुरू आहे अनेकांना समजू शकले नाही! “तुला पदावर बसविले,तुझ्यामुळ पक्षाची बदनामी होतेय ? तू काय करतोस?” पक्षाला तुझा काय उपयोग? अशाप्रकारचे किमान 20 मिनिटे जोराचे बोलणे झाल्यावर मोरेश्वर शेडगे व राजू दुर्गे हे कार्यालयाचा दरवाजा जोरात आपटून तावातावाने निघून गेल्याचे सर्वांनी पाहिले.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी हेही उपस्थित होते.

वाकडच्या विकास कामाची चर्चा!
वाकड भागात 100 कोटीच्या निविदा मंजूर झाल्या.या निविदा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध असताना कशा काय मंजूर झाल्या? तू कोणाचे काम करतोस? तुझा दबदबा नाही का? अशा प्रकारचा बोलणे ऐकू आल्याचे काहींनी सांगितले!

याप्रकरणी पक्षनेते नामदेव ढाके,स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे,माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी मात्र असे काही झालेच नाही आमची फक्त चर्चा झाली असा खुलासा केला आहे.