*ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलचा इंटरनॅशनल कारभार* नगरसेवक शितल शिंदे

पिंपरीचिंचवड प्रतिनिधी sakhi news live
पिंपरी-चिंचवड :‐ एका रात्रीत शाळेचे नाव बदलण्याची घटना पिंपरी-चिंचवड येथे घडली आहे. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल वरून एलप्रो इंटरनॅशनल स्कूल या नावाचा बदल शाळेच्या लावलेल्या पााटीत एका रात्रीत केला शाळेचा इंटरनॅशनल स्कूल चा इंटरनॅशनल कारभार आहे असे विद्यमान नगरसेवक शीतल शिंदे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पत्रकार कक्षात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सविस्तर वृत्त असे की,लॉकडाऊनच्या काळात शाळांनी विद्यार्थी-पालकांकडून कोणत्याही प्रकारची फीची मागणी करू नये, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांंनी केल्या आहेत. खरे तर याबाबतचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने ३० मार्च रोजी काढले आहे. मात्र तरीही काही शाळा फीवसुलीसाठी पालकांच्या मागे तगादा लावत असल्याने शिक्षणमंत्र्यांना सोशल मीडियाच्या माध्यमाने शाळांना ही तंबी द्यावी लागलेली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशाला मुठ माती देणारा प्रकार पिंपरी चिंचवड येथील एलप्रो इंटरनॅशनल स्कूल येथे घडला आहे. या शाळेने फी भरण्ययासाठी विद्यार्थ्यांनकडेे तगादा लावला आहे. विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी ईमेल केले जात आहेत. कोरोनामुळे लॉकडाउन असताना शाळा सुरू नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधांचा लाभ घेता आला नाही. तरीही एलप्रो इंटरनॅशनल स्कूल पूर्ण फीची मागणी करत आहे. विद्यार्थी हे बाहेर देशात शिकायला जातील या आशेने वडिलांनी विद्यार्थ्यांना ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षणासाठी टाकले. परंतु या शाळेने एका रात्रीत शाळेचे नाव बदलून एलप्रो इंटरनॅशनल स्कूल अशी पाटी लावली. या शाळेत फी न भरल्यामुळे पालकांना फोन करून फीच्या बाबतीत मागणी केली जात आहेे.ऑनलाईन क्लासेेेेस चालू असताना विद्यार्थ्यांना फी बाबत विचारणा करून त्यांचा अपमान केला जात आहे. असे आरोप पत्रकार परिषदेत आलेल्या पालकांनी केले.

चालू शैक्षणिक वर्षाच्या शालेय फी मध्ये 50 टक्के कपात करण्यात यावी व फोन व इ मेल द्वारे संपर्क करून त्रास देऊ नये अशी मागणी यावेळी पालकांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनचा इशाराही पालकांनी दिला आहे.