*पिंपरी मतदार संघातुन पुन्हा एकदा उपमहापौर!*

पिंपरी-चिंचवड sakhi news live उपमहापौरपदासाठी मोरवाडीचे प्रतिनिधित्व करणारे केशव घोळवे यांचे नाव निश्चित झाले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. दरम्यान, पुन्हा पिंपरी मतदारसंघातच पद जाणार आहे. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांना हा धक्का असल्याचे मानले जाते. कुठलेही सबळ कारण न देता उपमहापौर तुषार हिंगे यांचा 14 ऑक्टोबर 2020 रोजी तडकाफडकी राजीनामा घेण्यात आला होता. त्यामुळे उपमहापौरपद रिक्त झाले आहे. त्या जागी त्यांच्याच प्रभागातील घोळवे यांची निवड आहे.

उपमहापौरपदासाठी आज दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. भाजपमधील गोपीनाथ मुंडे गटाने उपमहापौरपद मिळविण्यासाठी मोर्चे बांधणी केली होती.
घोळवे याना संधी मिळू नये यासाठी भाजपा मधील आमदार समर्थक प्रयत्न करत होते. दरम्यान, स्वतः
पंकजा मुंडे यानी घोळवे यांनाच उमेदवारी द्यावी असा आग्रह केल्याने अखेर त्याचे नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमहापौरपदासाठी घोळवे यांनच संधी देण्यात आल्याचे शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे याना कळविले.
केशव घोळवे यांची कामगार नेते अशी ओळख आहे. संभाजीनगर, शाहूनगर, मोरवाडी प्रभागातून ते 2017 च्या निवडणुकीत भाजपकडून निवडून आले आहेत. पहिल्यांदाच ते निवडून आले आहेत.
मातब्बर समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण बहिरवाडे यांचा त्यांनी पराभव केला आहे. अ क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविलेले आहे.