पिंपळे सौदागर येथील गणेशम-२ सोसायटीतील आगीच्या घटनेची नाना काटे यांनी घेतली तातडीने दखल

पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागर परिसरातील गणेशम-२ सोसायटीमध्ये प्राथमिक माहितीनुसार, I-304 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अनंतवार कुटुंबीय यांच्या फ्रिजचा स्फोट होऊन फ्लॅटला गंभीर आग लागल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच माजी विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी कोणताही विलंब न करता अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली.
घटनेत घरातील मुलांना त्रास झाल्याची माहिती मिळताच तातडीने ॲम्बुलन्सची व्यवस्था करून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले. त्यानंतर नाना काटे यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या मुलांची विचारपूस केली तसेच त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
दरम्यान, नाना काटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेत आग तातडीने नियंत्रणात आणण्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासन आणि अग्निशमन विभागाच्या यंत्रणेशी समन्वय साधून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात आली.
