बातम्या

सखी दिवाळी अंकाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रकाशन उत्साहात संपन्न !

माझी सखी सोबती साप्ताहिकाच्या सखी दिवाळी अंकाचे प्रकाशन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले असून यावेळी संपादिका सायली कुलकर्णी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कार्लेकर इत्यादी उपस्थित होते.
गेली २६ वर्षाची परंपरा असलेल्या दिवाळी अंकामध्ये नामवंत लेखक, कवी यांचे लिखाण समाविष्ट करण्यात आले आहे.
सखी दिवाळी अंकाचे वाचक जाहिरातदार व हितचिंतक यांच्याकडून स्वागत होत असल्याचे संपादिका सायली कुलकर्णी यांनी सांगितले.