पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांना अभिवादन…

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात पिंपरी चिंचवड नगरीचे शिल्पकार तथा माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य विनोद नढे, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारीही उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आले. महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
