पिंपरी चिंचवडबातम्या

भोसरी विधानसभेत ‘मन की बात’चा सलग चौथ्या महिन्यात १००% बुथवर यशस्वी जागर!

मतदार संघातील सर्व ४८३ बुथवर उपक्रम यशस्वी
– आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनशक्ती

भोसरी विधानसभा मतदारसंघात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सलग चौथ्या महिन्यात मतदारसंघातील सर्व ४८३ बुथवर, म्हणजेच १०० टक्के बुथवर यशस्वी आयोजन करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या उपक्रमामुळे भोसरीतील भाजपाची संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. भाजपाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटनी यांनी ही माहिती दिली.

‘मन की बात’ हा केवळ रेडिओ कार्यक्रम नसून देशाच्या प्रत्येक घटकाशी थेट संवाद साधणारा जनसंवाद आहे, असे पटनी यांनी सांगितले. सामान्य माणसांच्या असामान्य कार्याची दखल घेणारा आणि राष्ट्रनिर्माणात प्रत्येकाचे योगदान अधोरेखित करणारा हा उपक्रम घराघरांत पोहोचावा, या उद्देशाने मतदारसंघात सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

सलग चार महिने सर्व ४८३ बुथवर कार्यक्रम घेणे सोपे नसते. त्यासाठी सातत्य, शिस्त, संघटन कौशल्य आणि देशाप्रती निष्ठा लागते, ती कार्यकर्त्यांनी सिद्ध करून दाखवली, असे पटनी यांनी नमूद केले. या यशात बुथप्रमुख व बुथ कार्यकर्ते, शक्तिकेंद्रप्रमुख, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, तसेच महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक आणि भोसरीतील जागरूक नागरिकांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

बुथप्रमुख व बुथ कार्यकर्ते : प्रत्येक बुथवर नियोजन, व्यवस्था आणि उपस्थितीची जबाबदारी निष्ठेने पार पाडली. शक्तिकेंद्रप्रमुख, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी : समन्वय साधून संपूर्ण मतदारसंघात एकसमान अंमलबजावणी केली. महिला, युवा व ज्येष्ठ नागरिक : उत्साहाने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. भोसरीतील नागरिक : वेळ काढून राष्ट्रहिताचे विचार ऐकले आणि इतरांपर्यंत पोहोचवले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रेरणादायी नेतृत्व आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे मौलिक मार्गदर्शन लाभत असल्याचे पटनी यांनी आवर्जून सांगितले. संघटन बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत उपक्रम पोहोचवण्यासाठी या नेतृत्वाने दिलेली दिशा कार्यकर्त्यांना सतत ऊर्जा देत आहे, असेही ते म्हणाले. हा उपक्रम केवळ आकडेवारीचा विषय नसून संघटनशक्ती, लोकसहभाग आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम आहे, असे सांगून पटनी म्हणाले की, पुढील काळातही हीच एकजूट आणि उत्साह कायम ठेवून भोसरीच्या विकासासोबतच राष्ट्रहिताचा विचार घराघरांत रुजवला जाईल.

” आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग चौथ्या महिन्यात भोसरी विधानसभेतील सर्व ४८३ बुथवर ‘मन की बात’ यशस्वीपणे पोहोचवणे, हे आमच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे आणि परिश्रमाचे फलित आहे. बुथप्रमुखांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत आणि सहभागी झालेल्या प्रत्येक भोसरीकरापर्यंत सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. राष्ट्रहिताचा विचार घराघरांत पोहोचवण्याचा हा उपक्रम भविष्यातही अशाच उत्साहाने सुरू राहील.”
– विकास डोळस, सरचिटणीस, भोसरी विधानसभा, भाजपा.