माजी मुख्यमंत्री,पद्भभूषण,दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अभिवादन…

पिंपरी, दि. १३ नोव्हेंबर २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण,दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सांगवी येथील त्यांच्या पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, ह प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे,उपायुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी संतोष कोराड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
दिवंगत वसंतदादा पाटील यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात राज्याच्या विकासासाठी आणि सहकार चळवळीच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वातून महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासाला दिशा मिळाली. विशेषतः सहकार, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा ठसा आजही कायम आहे.
