क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे विचार प्रबोधन पर्व २०२६ : विविध सांस्कृतिक, वैचारिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांची मेजवानी….
१४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान चिंचवड स्टेशन येथे होणार भव्य आयोजन…

पिंपरी, दि.१३ नोव्हेंबर २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचार प्रबोधन पर्व २०२६ चे आयोजन १४ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चिंचवड स्टेशन (पेट्रोल पंप शेजारी) करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवात सामाजिक प्रबोधन, वैचारिक, साहित्यिक, संगीत, लोककला अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस तसेच चिंचवड स्टेशन येथे क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून होणार आहे.
या प्रबोधन कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याशिवाय विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार महेश लांडगे,शंकर जगताप,उमा खापरे, अमित गोरखे,शंकर मांडेकर, महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याशिवाय शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया गटनेते कुणाल वाव्हळकर, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, महापालिकेचे सर्व प्रभाग अध्यक्ष, यांच्यासह अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर आणि विक्रांत बगाडे तसेच नगरसदस्य, नगरसदस्या व अधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे.
सर्वासाठी खुला व विनामूल्य असलेल्या या तीन दिवसीय। प्रबोधन पर्वामध्ये राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, अभ्यासक, व्याख्याते, साहित्यिक, कलाकार आणि लोककला सादर करणारे कलाकार सहभागी होणार आहेत.
क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांचा वारसा, सामाजिक समता, लोकसंस्कृती आणि प्रबोधनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.
…
प्रबोधन पर्वातील कार्यक्रम
शनिवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२६
सकाळी १०.३० वा. : उद्घाटन सोहळा, मा. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण
सकाळी १०.४५ वा. : चिंचवड स्टेशन येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण
सकाळी ९ ते ११ वा. : प्रबोधनात्मक गीतगायनाचा कार्यक्रम, सादरकर्ते – निलेश देवकुळे
सकाळी ११ ते दु. १ वा. : लेखणीचा बादशहा, सादरकर्ते – बापू पवार
सायंकाळी ५ ते ७ वा. : प्रबोधनात्मक गीतगायनाचा कार्यक्रम, सादरकर्ते – अनिकेत जवळेकर
सायंकाळी ७ ते रात्री १० वा. : देशभक्तीपर गीते, अभिमान महाराष्ट्राचा, सादरकर्ते – शाहिर शैलेश लोखंडे
…..
रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६
दुपारी ३ ते सायं. ५ वा. : प्रबोधनात्मक गीतगायनाचा कार्यक्रम, सादरकर्ते – निवास चव्हाण
सायंकाळी ५ ते ७ वा.: प्रबोधनात्मक गीतगायनाचा कार्यक्रम, सादरकर्ते – रणजीत खंडागळे
सायंकाळी ७ ते रात्री १० वा. : प्रबोधनात्मक देशभक्तीपर गीते, सादरकर्ते – शिल्पा पांचाळ (भवार)
…….
सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६
दुपारी ३ ते सायं. ७ वा. : प्रबोधनात्मक गीतगायनाचा कार्यक्रम, सादरकर्ते – अजय क्षीरसागर
सायंकाळी ५ ते ७ वा. : गाथा शूरवीरांची, देशभक्तीपर गीते, सादरकर्ते – स्नेहल नाईकवाडी व सहकलाकार
सायंकाळी ७ ते रात्री १० वा.: स्वरचंदन, सादरकर्ते – चंदन कांबळे
