उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

SAKHI NEWS LIVE:-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून उद्धव ठाकरे यांनीही त्याबद्दल आभार मानले आहेत.