राजकीय नेत्यावर छळाचा आरोप दाक्षिणात्य अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न

SAKHI NEWS LIVE:-

दक्षिण भारतीय चित्रपटांमधील अभिनेत्री विजयलक्ष्मीने आत्महत्याचे प्रयत्न केला आहे. विजयलक्ष्मीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी विजयलक्ष्मीने आपल्या प्रोफाइलवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने वेळातच माझा मृत्यू होईल असं म्हटलं होतं. सोशल मिडियावरुन मला खूप त्रास दिला जात आहे असा दावा करणारे काही व्हिडिओ विजयालक्ष्मीने याआधीही पोस्ट केले होते. सोशल मिडियावरुन होणाऱ्या या त्रासामुळे आपण मानसिक तणावामध्ये असल्याचेही तिने सांगितले होते. यामधूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

द टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार विजयालक्ष्मीने फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने, “हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. मागील चार महिन्यापासून सीमान आणि त्यांच्या पक्षांच्या समर्थकांमुळे मी मानसिक तणावमध्ये आहे. मी माझ्या कुटुंबासाठी जिवंत राहण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र मला ते शक्य होईल असं वाटत नाही. हरी नारद याने प्रसारमाध्यमांमध्ये माझ्याबद्दल बोलताना खूप अपमानास्पद शब्द वापरले आहेत. मी रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी गोळ्या खात आहे. काहीवेळामध्ये माझं ब्लड प्रेशर खूप कमी होईल आणि माझा मृत्यू होईल,” असं म्हटलं होतं. आपला मृत्यू हा लोकांसाठी एक उदाहरण ठरला पाहिजे असंही विजयालक्ष्मी व्हिडिओमध्ये म्हणाली होती. तसेच सीमान आणि हरि नारद सारख्या लोकांना माफ करु नये, मानसिक छळ करण्यासाठी त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी विजयालक्ष्मीने आपल्या चाहत्यांकडे केली होती.

सीमान हा एक तामिळ राजकीय पक्ष असून हरि नारद हे या पक्षाचे नेते आहेत. विजयालक्ष्मी हिने फ्रेण्ड्स या चित्रपटामधून तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या करियरची सुरुवात केली. या चित्रपटामध्ये सुर्याने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर ती कानडी चित्रपटांमध्ये काम करु लागली. मात्र मागील काही काळापासून तिला काम मिळत नव्हते. आर्थिक संकटाच्या काळामध्ये तिने चित्रपटसृष्टीमधील अनेकांकडे मदत मागितली. किच्चा सुदीप सारख्या तिच्या ओळखीतील व्यक्तींनी तिला मदत करण्याचा प्रयत्नही केला. मात्र तिला याचा फारसा फायदा झाला नाही.