बातम्या यश संपादन करून, देश सेवेसाठी तयार रहा!आमदार अश्विनीताई जगताप July 24, 2023December 15, 2023 Editor Prtinidhi सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णीसांगवी:- दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनो मिळालेल्या संधीच सोनं करून अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी मारा, यश संपादन करून, देश सेवेसाठी तयार रहा,शिक्षणाच्या अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत असे आवाहन चिंचवड विधानसभेच्या लोकप्रिय आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप यांनी बोलताना केले.सातारा मित्र मंडळाच्या वतीने सांगवी येथे आयोजित नागरी सत्कार व दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला त्यावेळी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य श्री आबासाहेब जंगले उपस्थित होते. आमदार जगताप पुढे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रात उंच भरारी मारण्याची संधी उपलब्ध असून त्यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा घेऊन नेत्र दीपक यश मिळवावे आणि समाजसेवेत स्वतःला झोकून द्या..तुमच्या जीवनात काही अडचणी आल्यास मी तुमच्या पाठीमागे ठाम उभी आहे . मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन समाजासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करा असा आपुलकीचा सल्ला आमदार अश्विनीताई जगताप यांनी यावेळी बोलताना दिला. सत्काराला उत्तर देताना सातारा मित्र मंडळ सांगवी चा कार्यक्रम हा माझ्या माहेरचा कार्यक्रम आहेआणि माझ्या माहेरच्या माणसांनी माझा सत्कार केला म्हणजे मला लढण्याचं अधिक बळ मिळाले. मी नेहमीचं तुमच्या बरोबर आहे. असाच समाजसेवेचा वसा चालु ठेवा कारण सातारा जिल्ह्याची ही परंपरा आहे. सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देते. यावेळी आमदार ताईंच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी महाराष्ट्र कामगार भूषण मा. मोहन गायकवाड , नगरसेवक शशिकांत कदम, माजी स्थायी समिती चेअरमन प्रशांत शितोळे, राजेंद्र राजापूरे ,वृक्ष प्रेमी सामजिक कार्यकर्ते अरुण पवार, सूर्यकांत गोफणे, वसंत यवले, प्रकाश घोरपडे, सर्जेराव चव्हाण, बापूसाहेब ढमाले, विजय जंगम, धनाजी जाधव पालक विद्यार्थी, व सर्व सातारा मित्र मंडळ सांगवी चे सभासद उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळांचे उपाध्यक्ष विरेंद्र गायकवाड, अरविंद जाधव, सहसचिव अमोल खोत, सह खजिनदार अभिजित जगताप, सदस्य विश्वास शिंदे,लक्ष्मण शिंदे, अमित देशमाने, उमेश पाटील, सूरज चव्हाण, गणेश शिंदे, दत्ताकुमार मोरे, जावेद फरास, यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे निवेदन मंडळाचे सचिव सोमनाथ कोरे यांनी केले कार्यक्रमांचे प्रस्ताविक मंडळांचे अध्यक्ष मा. शिवाजीराव माने व आभार मंडळांचे कार्याध्यक्ष मा. संजय चव्हाण यांनी केले. Post Views: 313