पिंपरी चिंचवडबातम्या

ध्वनी प्रदूषणाच्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात एकच धोरण लागू करा – रविराज काळे आप प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी

पिंपरी : डीजे आणि त्यामुळे होणाऱ्या तीव्र ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने शहरनिहाय वेगवेगळी भूमिका घेण्याऐवजी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच स्पष्ट धोरण ठरवावे.

मुंबईत कारवाई, नागपुरात निर्बंध आणि पुण्यात वेगळी भूमिका असे वेगवेगळे नियम का ? सरकारने ठरवावे की डीजे हवा आहे की नको. मंत्रिमंडळात निर्णय घ्यावा आणि त्याची संपूर्ण राज्यात समान अंमलबजावणी करायला हवी..

नागपुरात पोलिस आयुक्तांनी डीजे आणि लेझरच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. मुंबईतही अशा प्रकारांवर कारवाई केली जाते आहे . मग पुण्यासाठी वेगळे आणि महाराष्ट्रातील अन्य शहरांसाठी वेगळे निकष का आहेत.

विद्यानंद बापट यांनी पुण्यात ध्वनीप्रदूषणाविरोधात घेतलेल्या भूमिकेला पुणेकरांचा पाठिंबा आहे आज मोठ्या प्रमाणात पुण्यातील नागरिकांनी बालगंधर्व चौक ते पुणे महानगरपालिका समोर पर्यंत एकत्र येत मोर्चा देखील काढला असल्याचे रविराज काळे यांनी सांगितले. डीजेमुळे निर्माण होणारा प्रचंड आवाज नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा असून हा प्रश्न मुख्यमंत्री एका दिवसात सोडवू शकतात, मग त्यासाठी ‘लोकसंवादाची गरज काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला

संवाद आवश्यक असला, तरी सरकारकडे ठोस निर्णयक्षमता आणि राजकीय इच्छाशक्तीही असली पाहिजे, डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावून राज्यव्यापी धोरण ठरवावे, अशी आमची मागणी आहे .सरकारला अनेक राजकीय निर्णय काही तासांत घेता येतात. मग नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित डीजेच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी एवढा वेळ का लागतो?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

डीजेचा मुद्दा केवळ ध्वनीप्रदूषण किंवा सामाजिक प्रश्नापुरता मर्यादित राहिलेला नसून त्याला राजकीय वळण प्राप्त झाल्याचे आहे . सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विविध राजकीय पक्षांशी संबंधित कार्यकर्ते असतात. त्यामुळे या विषयावर सर्वपक्षीय बैठक घेऊन स्पष्ट भूमिका निश्चित करणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते.

पुणे हे सामाजिक सुधारणा आणि वैचारिक चळवळींची परंपरा असलेले शहर आहे. अशा शहरात एखाद्या नागरिकाने ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न उपस्थित केला म्हणून त्याची हेटाळणी करणे किंवा त्याच्यावर हल्ला करणे योग्य नसल्याचे रविराज काळे म्हणाले.

विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पुण्यात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा विषय अधिक तीव्रतेने चर्चेत आला आहे. त्याचवेळी नागपूरमध्ये डीजे आणि लेझरबाबत निर्बंधांची भूमिका घेतली जात असल्याने राज्यभर एकसमान धोरणाची मागणी केली आहे’ सरकारने डीजेबाबत स्पष्ट राज्यव्यापी धोरण निश्चित करून त्याची सर्व शहरांत समान अंमलबजावणी करावी, अशी मागणी आपचे युवक प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांची आहे