मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटींच्या आरोप प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि ५०० कोटी देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना तात्काळ अटक व्हावी – रविराज काळे प्रदेशाध्यक्ष आप युवा आघाडीची मागणी*
केवळ आरोपावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तुरुंगात डांबणारी ED, CBI, पोलीस यंत्रणा आता कुठे आहे?*

मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेली ऑडिओ क्लिप आणि भाजप-एकनाथ शिंदे यांच्यातील ५०० कोटींच्या व्यवहाराचा आरोप हा राजकीय वाद नाही. तो मराठा समाजाच्या स्वप्नांचा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “ना घेतले, ना दिले.” मग ही क्लिप कुठून आली? या क्लिपमध्ये भाजपचे कोणते आमदार व पदाधिकारी सहभागी होते, ५०० कोटी रुपये कोणी, कसे आणि का दिले हे जनतेसमोर आले पाहिजे.
या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनीही हे स्पष्ट करावे की ही ऑडिओ क्लिप त्यांना कधी, कुठून आणि कशी मिळाली; तिचा स्रोत काय आहे. जनतेच्या विश्वासाचा प्रश्न असल्याने त्यांनीही सर्व तपशील खुले करावेत.
आम आदमी पार्टीची मागणी स्पष्ट आहे — एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि ५०० कोटी रुपये देणाऱ्या भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तात्काळ अटक व्हावी आणि या काळ्या पैशांची न्यायालयीन देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी व्हावी. ऑडिओ क्लिपची सत्यता स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासावी. अन्यथा, आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभारेल.
पण आज प्रश्न हा आहे की, तपास यंत्रणा का गप्प आहेत? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहा महिने तुरुंगात डांबले, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दोन वर्षे तुरुंगात ठेवले — पुरावा नसताना! आणि आज भाजपच्या नेत्यावर ५०० कोटींच्या व्यवहाराचा आरोप आहे, आता ED, CBI कुठे आहे? का हे दुटप्पी धोरण? *केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासाठी ओव्हरटाईम काम करणाऱ्या ED, CBI, Police यंत्रणांनी एकनाथ शिंदे-श्रीकांत शिंदे यांच्यासाठी झोपेचे सोंग घेतले आहे का?*
*गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम आदमी पार्टीचा सवाल आहे की*, तुमच्याच पक्षाचे पदाधिकारी सांगत आहेत की भाजपने तुमच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांना ५०० कोटी दिले. मग तुम्ही गृहमंत्री म्हणून काय करणार? तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार का? एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची अटक करणार का?
*असे ५०० कोटी रुपये देण्यात भाजपचा हेतू काय?* मराठा आंदोलन, ओबीसी आंदोलन, आदिवासी विद्यार्थी आंदोलन, शेतकरी आंदोलन, तरुणांचे आंदोलन — कोणतेही आंदोलन असो, भाजप ते साम, दाम, दंड, भेद वापरुन दडपण्याचा प्रयत्न का करते? शांततामय आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्यासाठी ५०० कोटींचा खेळ का खेळला जातो? हे षडयंत्र कोणी रचले?
*संपूर्ण राज्य भीषण दुष्काळाने होरपळत असताना, सत्ताधारी पक्ष काळ्या पैशाच्या बळावर आंदोलनांची कुचंबणा करण्यात गुंतला आहे* — ही महाराष्ट्रासाठी शरमेची गोष्ट आहे.
