पिंपरी चिंचवडबातम्या

आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!

प्रत्येक मत लोकशाही बळकट करण्यासाठी मोलाचे : आमदार शंकर जगताप*

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी शुक्रवारी पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे केवळ कर्तव्य नसून सक्षम नेतृत्व निवडण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालयाच्या जुन्या इमारतीतील मतदान केंद्र क्रमांक १०५ येथे आमदार जगताप यांनी शुक्रवारी सकाळी मतदान केले.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आमदार शंकर जगताप यांनी लोकशाही प्रक्रियेतील प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित केले. लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मतदानाची भूमिका महत्त्वाची असून, प्रत्येक मत हे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मोलाचे योगदान ठरते, असे त्यांनी नमूद केले.