सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही…

भारत-चीन यांच्यातील सीमावाद ताणला गेल्यानंतर सोमवारी रात्री दोन्ही सैन्य दलांमध्ये संघर्ष झाला. यात २० भारतीय जवान हुतात्मा झाले. या घटनेनंतर देशभरात चीनविषयी संतापाची भावना निर्माण झाली आहे. सीमेवर काय घडलं याबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारले जात आहे. दरम्यान, सीमेवर घडलेल्या घटनेविषयी बोलताना संजय राऊत यांनी भूमिका मांडली.

“सीमेवर जे घडलं, त्यासाठी आपण जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही,” असं मत त्यांनी यावेळी मांडलं.