सोबती” ॲप कोवीड १९चे उद्घाटन महापौर माई ढाेरे यांच्या हस्ते संपन्न पिंपरी

पिंपरी चिंचवड !सखी न्युज लाईव्ह

महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सारथी अंतर्गत”सोबती” ॲप हे कोवीड १९ अंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी विकसीत करण्यात आले असून त्याचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनीे आज पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात केले..
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके,विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी, संदीप वाघेरे, उषा वाघेरे, निकिता कदम, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, स्मिता झगडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरुमणी, संगणक विभाग प्रमुख निळकंठ पोमण आदी उपस्थित होते.

सदर ॲप चा वापर हा वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत नेमण्यात आलेल्या सर्वेक्षण टीम अंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षणासाठी केला जाईल.यामध्ये वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचे वर्गीकरण करून त्यांच्यावर ते विशेष लक्ष देण्यात येईल, कोरोना बाबत नागरिकांमध्ये काही लक्षणे जाणवल्यास त्याची नोंद घेणेत येईल. सदर नागरिकांना तपासणीसाठी पाठवले जाईल याद्वारे शहरातील कोरोनाचा प्रसार किती प्रमाणात आहे व योग्य वेळी,योग्य उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास याचा उपयोग होईल, सदर ॲप हे अँड्रॉइड तथा आयएस या दोन्ही फोन वर चालेल .आज पर्यंत अठराशे नागरिकांची नोंद सर्वेक्षण टीम अंतर्गत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे .याद्वारे खासगी दवाखान्यांमध्ये कोरोना बाबतची लक्षणांच्या नागरिकांची देखील नोंद घेण्यात येईल, सर्व खासगी दवाखान्यांना देखील या ॲपद्वारे आपल्याकडे आलेल्या नागरिकांची नोंद करता येईल. अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.