महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने राबवणार १५ जुन पासुन ई-साहित्य निर्मिती उपक्रम। आयुक्त श्रावण हर्डीकर

सखी न्युज लाईव्ह मा.आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ई- साहित्य निर्मिती उपक्रम शिक्षण विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका राबविणार आहे.
आज दिनांक 11 जून 2020 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील मनपा शाळा (जुना ड प्रभाग) येथे शिक्षण विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्याध्यापकांची सह विचार आयोजित करण्यात आली होती सदर कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी मा. आयुक्त श्री.श्रावण हर्डीकर साहेब, मा. अति,आयुक्त श्री. संतोष पाटील साहेब, मा.प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे,मा.सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री. पराग मुंढे, सर्व पर्यवेक्षक, विषयतज्ज्ञ,तंत्रस्नेही, उपस्थित होते.*
सदर सहविचार सभेमध्ये 15 जून पासून शाळा सुरू होणार नसून शालेय शैक्षणिक सत्र सुरू होत आहे.त्यामुळे मुख्याध्यापकांनी शाळा पर्व तयारी, शाळा – वर्ग निर्जंतुकीकरण करणे, शालेय परिसर स्वच्छता, स्वच्छतागृह स्वच्छ करणे, शाळेतील मुलांना स्वच्छते महत्त्व, सॅनिटायझर ,मास्क, वापरणे,या सूचना देणे. समग्र शिक्षा अंतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करणे, 15 जून 2020 पासून प्रत्येक वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम कसा घ्यावा. शाळा व्यवस्थापन समिती च्या सल्ल्याने शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करणे ,*
मनपा शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने मनपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी ऑनलाईन अथवा ऑफलाईन 15 जून करण्यात येणार आहे. याकामी महिला बचतगट सदस्य, शाळा व्यवस्थापन सदस्य, माजी विद्यार्थी, या स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे.
सर्व माध्यममाचे इ साहित्य तयार केले असून कम्युनिटी रेडिओ, स्थानिक केबल नेटवर्क, दूरदर्शन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे.