मुख्य लेखा व वित्त अधिकारी – या पदाचे पदनाम “मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त)” व इंग्रजी भाषेमध्ये Chief Accounts and Finance Officer cum Director (Finance) असे नमूद करण्याचे आयुक्तांचे आदेश

“मुख्य लेखा व वित्त अधिकारी”* या पदाचे पदनाम “मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) व इंग्रजी भाषेमध्ये Chief Accounts and Finance Officer cum Director (Finance)” असे नमूद करण्याचे आयुक्तांचे आदेश
पिंपरी प्रतिनिधी सखी न्यूज लाईव्ह
सायली कुलकर्णी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी हे पद शासनाच्या वित्त व लेखा सेवेतील सह संचालक संवर्गासाठी अधिसुचीत केलेले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदांचा आकृतीबंध मंजूर झालेला असून त्यामध्ये मनपाचे वित्त व लेखा शाखा विभागप्रमुखांचे पदनाम मुख्य लेखा व वित्त अधिकारी असे नमूद करण्यात आलेले आहे. तथापि वित्त विभागाच्या शासन आदेशान्वये मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे पद महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील “संचालक” संवर्गात ७ व्या वेतन आयोगानुसार पे मेट्रीक्स मधील वेतन स्तरात येत असल्याने त्यात श्रेणीवाढ करण्यात आलेली आहे. शासन आदेशानुसार वित्त विभागाने महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील विविध संवर्गासाठी सुधारीत पदनामे विहीत केलेली आहेत. सदर शासन निर्णयातील सुधारीत पदनाम “संचालक” असे करण्यात आलेले असून आस्थापनेवर मंजूर “मुख्य लेखा व वित्त अधिकारी” या पदाचे पदनाम मराठी भाषेमध्ये “मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) व इंग्रजी भाषेमध्ये” Chief Accounts and Finance Officer cum Director (Finance)” असे करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी आज निर्गमीत केलेल्या आदेशानुसार मान्यता दिली आहे. पदनामात बदल केल्यामुळे या पदाच्या विद्यमान वेतनश्रेणी ,कर्तव्ये आणि जबाबदा-या यामध्ये कोणताही बदल होणार नाही, प्रस्तुतचा बदल करण्यात आलेल्या पदनामाच्या नोंदी मनपा दप्तरी आवश्यक त्या ठिकाणी घेण्यात याव्यात व या आदेशान्वये मनपाचे सर्व संबंधित विभागांनी कार्यालयीन कामकाजात त्याप्रमाणे वापर करावा असे कळविण्यात आले आहे..