बातम्या स्वर्गीय उषाताई गोरे स्मरणार्थ बनसारोळा येथे स्वागत कमान लोकार्पण सोहळा संपन्न ! June 26, 2023June 26, 2023 Editor सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णीबनसारोळा :-प्राचीन काळापासून धार्मिक महत्व असलेल्या श्री क्षेत्र बनेश्वर देवस्थान यांच्या बनसारोळा या पवित्र भूमीत स्वर्गीय उषाताई गोरे यांच्या स्मरणार्थ अहिल्यादेवी होळकर चौक येथे नव्याने उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा त्यागमुर्ती ह भ प लालासाहेब उर्फ नाना पवार यांच्या शुभहस्ते व सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात नुकताच पार संपन्न झाला. यावेळी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बनसारोळा नगरीचे धार्मिक महत्व आणि सौदर्य वाढावे या उद्देशाने स्वर्गीय उषाताई बापूसाहेब गोरे चॅरिटेबल ट्रस्ट चिंचवड पुणे यांच्या वतीने बनसारोळा येथे आधुनिक पद्धतीची सुमारे २८ फूट उंच आणि ३५.५ फूट रुंद अशी भव्य कमान अहिल्यादेवी होळकर चौकाजवळ मुख्य रस्त्यावर उभारण्यात आली. या कमानीचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळ्याचे अध्यक्षपद त्यागमुर्ती ह भ प लालासाहेब उर्फ नाना पवार यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा,ह भ प अनंत महाराज काकडे,माजी सरपंच श्री.जयचंद धायगुडे,श्री.अशोक अप्पा काकडे,श्री.भागवत दादा गोरे,भीमराव उर्फ मालक गोरे, विविध सेवा सहकारी सोसायटी चेअरमन नाना गुरुजी,माजी जिल्हा परिषद सदस्य युवराजदादा गोरे,तंटा मुक्ती अध्यक्ष बाळासाहेब जाधव,माजी तंटा मुक्ती अध्यक्ष, बालासाहेब काकडे, मंत्री धनंजय मुंडे स्विय सहाय खंडू गोरे,माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गोरे, केज तालुका सावता परिषद,अध्यक्ष भारत गोरेसामाजिक कार्यकर्ते अजय काळे, दिलीप गोरे,अविनाश धायगुडे व्यंकट उर्फ तात्या गोरे,डॉ नंदकुमार गोरे,,सामाजिक कार्यकर्ते, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ व सोशल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,कोषाध्यक्ष इत्यादी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब गोरे यांनी केले तर सूत्रसंचालन आदिनाथ धायगुडे सर तर भागवत गोरे सर यांनी आभार मानले. Post Views: 195