बातम्या *काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे 60 वर्षात देशाचे अतोनात नुकसान – नितीन गडकरी* November 17, 2024 Editor प्रतिनिधी – सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णीआपल्या देशात पैशाची कमतरता नाही मात्र इमानदारीने काम करणाऱ्या नेत्यांची कमतरता आहे. याचाच दुष्परिणाम आपल्या देशाने काँग्रेस सरकारच्या 60 वर्षांच्या सत्ताकाळात भोगले. काँग्रेसने देशाचे नेतृत्व न करता देशाचे व्यापारी होण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ‘ज्या देशाचा राजा व्यापारी; त्या देशाची प्रजा भिकारी’ अशी अवस्था आपल्या देशाची झाली होती. मात्र २०१४ साली देशाच्या जनतेने योग्य पक्ष, योग्य नीती आणि योग्य नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत देशात सत्तापालट केला. आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशात विकासाची गंगा आली. त्यामुळे आजच्या या देशाच्या विकासाचे संपूर्ण श्रेय हे देशातील सर्व जनतेला आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.(कोट)चिंचवड विधानसभा मतदारसंघाची ओळख ही विकसनशील मतदारसंघ म्हणून आहे. 2009 पासून या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शहरीकरण आणि औद्योगिकरण झाले. या वाढत्या लोकसंख्येमुळे या मतदारसंघात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करताना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. मात्र स्व. लक्ष्मणभाऊंनी केंद्र शासन, राज्यातील महायुती सरकार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपच्या माध्यमातून या प्रभागात अनेक विकासकामे करून या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर यांसह रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले. यापुढील काळात मतदारसंघातील पाणी, वाहतूक कोंडी, प्रदूषण या काही प्रमुख समस्या केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लावून आपला चिंचवड विधानसभा मतदारसंघ विकसित मतदारसंघ म्हणून नावारूपास आणण्याचे काम मी करणार आहे.- शंकर जगताप (महायुतीचे उमेदवार)मा.शंकर पांडुरंग जगतापशहराध्यक्ष : भारतीय जनता Post Views: 33