सातव्या योग दिनानिमित चिंचवड येथे जलनेती प्रशिक्षण संपन्न!
सातव्या योग दिनानिमित चिंचवड येथे जलनेती प्रशिक्षण संपन्न!
चिंचवड-(प्रतिनिधी) सातव्या जागतिक योग दिनानिमित्त योगा क्यूयर आणि स्वस्थ क्लिनिक यांच्या वतीने चिंचवड येथे मोफत जलनेती प्रशिक्षण घेण्यात आले असल्याची माहिती डॉ रीना वनारसे यांनी दिली.
योगा बदल जनतेत जागृती व्हावी व कोरोनापासून नागरिकांनी कसा बचाव करावा याचे प्रशिक्षण देण्यात आले.
नाशिक येथील योग विद्या गुरुकुल संस्थेने एक लाख नागरिकांना जलनेतीचे प्रशिक्षण देण्याचे आयोजन केले असून त्यामध्ये कोरोनापासून संरक्षण कसे करावे याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे.आतापर्यंत पोलीस,शिक्षक,शासकीय कार्यालये,सामाजिक संस्था व सहकारी सोसायटीच्या एक हजार नागरिकांना प्रशिक्षण दिले असून पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सर्व मेडिकल स्टाफ दररोज जलनेती करतात त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाली नसल्याची माहिती डॉ वनारसे यांनी दिली.